'पुष्पा 2'चा पोस्टर टीझर सहित रिलिज!

 'पुष्पा' द राइज या चित्रपटाच्या दमदार यशा नंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी या चित्रपटाचा पुढील भागाचा पोस्टर रिलीज केला आहे.

डिसेंबर २०२१  मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन याच्या भूमिकेने प्रेक्षकांना आकर्षित केले होते. या चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.

नुकताच अल्लु अर्जुन च्या जन्मदिनी या चित्रपटाचे पोस्टर टीझर सहित रिलिज करण्यात आले.


    

'पुष्पा' द रुल या टीझर ने काही तासात लाखो व्ह्यूज मिळवले.' अब होगा पुष्पा का रूल ' असे म्हणत पुष्पा ने आपल्या शैलीत धमाका केला आहे.

टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो,  'तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.' तर दुसरी न्युज अँकर म्हणते, 'पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या' आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते.

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.


No comments:

Post a Comment